रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: वेलिंग्टन , शनिवार, 9 जानेवारी 2021 (14:14 IST)

मला न्यूझीलंड संघाचा अभिमान वाटतो : स्टीड

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आपल्या खेळाडूंचे कौतूक केले आहे. 
 
ते म्हणाले, माझ्या मते या घडीला क्रमांक एकचा संघ बनणे विशेष गोष्ट आहे. न्यूझीलंडच्या अनेक माजी खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत खूप मेहनत घेतली आणि सध्याच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांकाचा गौरव प्राप्त करत न्यूझीलंडसाठी यापूर्वी खेळलेल्या खेळाडूंचा एक प्रकारे गौरवच केला आहे. आमचे खेळाडू सध्या उत्तम कामगिरी करत असल्याने मला त्यांचा अभिमान आहे.