शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (16:59 IST)

IND vs AFG : भारत अफगाणिस्तानविरुद्ध सामना, भारत जिंकण्याच्या प्रयत्नात

India vs Afghanistan 2nd T20  : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका काबीज करायची असेल, तर अफगाणिस्तानला टिकण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. मोहालीत खेळवण्यात आलेला पहिला टी-२० सामना भारताने सहा गडी राखून जिंकला होता. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. 
 
मोहालीत खेळल्या गेलेल्या टी-20मध्ये विराट खेळला नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाला खूप बळ मिळेल. विराटने टी-२० मध्ये शतक झळकावले असून त्याचे शतक अफगाणिस्तानविरुद्धच झाले आहे. विराटने 2022 च्या आशिया कप टी-20 दरम्यान हे केले होते. तो T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय आणि एकूण चौथा खेळाडू होण्यापासून 35 धावा दूर आहे. 
 
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण सहा T20 सामने खेळले गेले आहेत आणि रोहित आणि कंपनीने त्यापैकी पाच जिंकले आहेत. अफगाणिस्तानने अद्याप आपले विजयाचे खाते उघडलेले नाही. एक सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघ इंदूरमध्ये एकूण तीन टी-२० सामने खेळला आहे. यामध्ये संघाने दोन सामने जिंकले आणि एकात पराभव पत्करावा लागला
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) रोजी .इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.00 वाजता सुरू  होणार आहे.
 
T20 मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर , अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
 
अफगाणिस्तान : इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीप) इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमातुल्ला ओमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद , नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.
 
Edited By- Priya Dixit