Festival Posters
✕

IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला

Updated: रविवार, 8 डिसेंबर 2024 (11:48 IST)

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव 175 धावांवर संपला आणि रोहित आणि कंपनीने 18 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने 19धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. उस्मान ख्वाजा नऊ धावांवर नाबाद राहिला आणि मॅकस्विनी 10 धावांवर नाबाद राहिला. मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी295 धावांनी जिंकली होती. 
 
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या होत्या. शुक्रवारी उस्मान ख्वाजाला बुमराहने बाद केले. शनिवारी कांगारूंनी एका विकेटवर 86 धावांवर खेळ सुरू केला आणि शेवटच्या नऊ विकेट गमावून 251 धावा केल्या.भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. बुमराह आणि सिराजशिवाय नितीश रेड्डी आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांवरच आटोपला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही भागीदारी तोडली.
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

पुढील लेख
Show comments