IND vs AUS: मेलबर्न मध्ये भारताचा कसोटीत 184 धावांनी पराभव, मालिकेत 2-1 अशी आघाडी
मेलबर्न मधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटीखेळली गेली. उभय संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 184 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात घेतला आणि पहिल्या डावात 474 धावा केल्या.भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला.
या सामन्यात टीम इंडियासमोर चौथ्या डावात 340 धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 155 धावांवर गारद झाला. टीम इंडियाला या डावात केवळ यशस्वी जैस्वालच्या बॅटने 84 धावा मिळाल्या, याशिवाय इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघाने बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव करून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये टीम इंडियाला 340 रन्सचं टार्गेट होतं पण ते फक्त 155 रन्स करू शकले.
कांगारू संघाकडून गोलंदाजी करताना त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बॅलंड यांनी 3-3 विकेट्स घेण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने 3-3 तर नॅथन लियॉनने 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन संघाने आता या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
Edited By - Priya Dixit