शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (10:32 IST)

IND vs AUS: विराट कोहलीने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत मोठी कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण करून इतिहास रचला. कोहलीने पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या. तो सर्वात जलद 25,000 धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात विराटने महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
 
कोहलीने त्याच्या 549 व्या आंतरराष्ट्रीय डावात हा आकडा गाठला. दुसरीकडे सचिन तेंडुलकरने यासाठी 577 डाव खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 588 धावा, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिसने 594, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 608 आणि महेला जयवर्धनेने 701 डावात 25000 धावा पूर्ण केल्या.
 
कोहलीला टॉड मर्फीने बाद केले.
केएल राहुल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहली क्रीजवर आला. त्याने 31 चेंडूत 20 धावा केल्या. टॉड मर्फीने विराटला स्टंप आऊट केले. मात्र, तो बाद झाल्यानंतरही टीम इंडियाने सहा विकेट्स राखून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. त्याचवेळी भारतीय संघ २६२ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात एक धावांची आघाडी मिळाली. त्यांचा संघ दुसऱ्या डावात 113 धावांत गारद झाला. त्यामुळे भारताला 115 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा करून सामना जिंकला.