IND vs ENG : कोहलीच्या पुनरागमनाबाबत BCCI ने दिले एक मोठे अपडेट
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, तिन्ही कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र कोहलीच्या पुनरागमनाबाबत सस्पेंस कायम आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने याबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. गुरुवारी बीसीसीआयचे अधिकारी आणि निवड समिती यांच्यात बैठक होणार असून त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
कोहलीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विराटने टीम मॅनेजमेंटशी चर्चा केलेली नाही आणि निवडकर्त्यांशीही चर्चा झालेली नाही.
अधिकाऱ्याने असेही सांगितले की पण एक गोष्ट निश्चित आहे की विराट कोहली स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध घोषित करताच त्याला संघात समाविष्ट केले जाईल. विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळला नव्हता. विराट दुस-यांदा वडील होणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतल्याचे समजते.
Edited By- Priya Dixit