सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 28 जानेवारी 2024 (17:51 IST)

IND vs ENG : पहिल्या कसोटीत भारताचा 28 धावांनी धक्कादायक पराभव

Cricket_740
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
 
पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता, मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी करत सामना जिंकला. 190 धावांनी पिछाडीवर असताना इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार होते दुसऱ्या डावात196 धावा करणारा ऑली पोप आणि दुसऱ्या डावात सात बळी घेणारा टॉम हार्टली. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना हरला होता.
 
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या आणि 190 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 202 धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
 
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बेन स्टोक्सच्या 70 धावांमुळे संघाला 246 धावा करण्यात यश आले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 80 धावांचे, लोकेश राहुलने 86 धावांचे आणि रवींद्र जडेजाने 87 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जो रूटने चार तर हार्टले आणि रेहानने प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑली पोपने 196 आणि बेन डकेटने 47 धावा केल्या. भारताच्या बुमराहने चार आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडचा संघ 420 धावा करण्यात यशस्वी ठरला आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या. अश्विन आणि भरत यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या. इंग्लंडच्या टॉम हार्टलेने सात विकेट घेत संघाच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले.
 
Edited By- Priya Dixit