शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:00 IST)

IND vs ENG: मायकेल वॉनने भविष्यवाणी केली आहे की भारत किंवा इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका कोण जिंकेल

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. भारतीय क्रिकेटबद्दल वॉनची टिप्पणी भारतीय क्रिकेट चाहत्यांना फारशी आवडत नाही. इंग्लंडचा संघ यावर्षी भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा वॉनने कसोटी मालिकेदरम्यान भारतीय खेळपट्टीबद्दल बरीच नकारात्मक विधाने केली होती, त्यासाठी भारतीय चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल केले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे, तेव्हा वॉनने याबद्दल बोलले आहे, तसेच कोणता संघ कसोटी मालिका जिंकेल याचा अंदाज वर्तवला आहे. या मालिकेत इंग्लंडच्या मजबूत आणि कमकुवत बाजू काय असतील हेही मायकेल वॉनने सांगितले आहे.
 
मायकल वॉन क्रिकबझवर म्हणाला, 'बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंड संघाचे खूप नुकसान होईल. स्टोक्सच्या अनुपस्थितीत संघाला समतोल साधण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इंग्लंड संघाचा अव्वल फलंदाजी क्रम फारच अननुभवी आहे, त्यामुळे जो रूटवर दबाव खूप जास्त असेल. स्टोक्सच्या अनुपस्थितीत इंग्लंडला एक अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाजाचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये होईल का हे पाहावे लागेल. इंग्लंडला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल, पण नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या घरातील मालिकेत संघाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारताला ही मालिका जिंकण्याची उत्तम संधी असेल.
 
वॉन म्हणाला, 'मला हे अजिबात म्हणणे चांगले वाटत नाही, पण मला वाटते की इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची भारताला सर्वोत्तम संधी असेल. भारत ही कसोटी मालिका 3-1 ने जिंकू शकतो.
 
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका पूर्ण वेळापत्रक
 
पहिली कसोटी, ऑगस्ट 4-8, नॉटिंघम , दुपारी 3:30 (IST)
 
दुसरी कसोटी, 12-16 ऑगस्ट, लंडन, दुपारी 3:30 (IST)
 
तिसरी कसोटी, 25-29 ऑगस्ट, लीड्स, दुपारी 3:30 (IST)
 
चौथी कसोटी, 2-6 सप्टेंबर, लीड्स, दुपारी 3:30 (IST)
 
पाचवी कसोटी, 10-14 सप्टेंबर, मँचेस्टर, दुपारी 3:30 (IST)
 
भारतीय कसोटी संघ:  विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह,अभिमन्यू ईश्वरन,रवींद्र जडेजा, ऋषभ पंत,अक्षर पटेल,चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे,केएल राहुल,ऋद्धीमान साहा,मोहम्मद शमी,इशांत शर्मा,रोहित शर्मा,पृथ्वी शॉ,मोहम्मद सिराज,शार्दुल ठाकूर,हनुमा विहारी,उमेश यादव,सूर्यकुमार यादव.
 
इंग्लंड कसोटी संघ:  जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स,जोस बटलर, जॅक क्रॉले,सॅम कुरन,हसीब हमीद,डॅन लॉरेन्स,जॅक लीच,ऑली पोप,ऑली रॉबिन्सन,डोम सिब्ले, मार्क वुड.