शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (12:23 IST)

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द

IND vs ENG World Cup Warm Up Match 2023 :  वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामन्यात सहभागी होत आहेत. गुवाहाटी येथे शनिवारी (30 सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे पंचांनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.
 
भारत आणि इंग्लंडच्या संघांना विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळाली नाही. दोघांमधील पहिला सराव सामना गुवाहाटी येथे होणार होता, मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. गुवाहाटी येथील स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक पोहोचले होते, मात्र त्यांना निराश होऊन परतावे लागले. या मैदानावर 29 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना पूर्ण झाला. त्यात बांगलादेशने सात गडी राखून विजय मिळवला होता.
 
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे पंचांनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले. टीम इंडिया आता 3 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे.
 
 



Edited by - Priya Dixit