IND vs ENG: विराट कोहलीचा नावावर आणखी एक विश्वविक्रम,सचिन तेंडुलकरला मागे टाकले
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटीत विराटने 17.6 षटकांत जेम्स अँडरसनच्या चेंडूवर चौकार मारताच त्यांनी हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंदवला. विराटने केवळ 490 डावांमध्ये 23,000 धावांचा टप्पा गाठला आहे, त्याआधी सर्वात जलद 23,000 आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम तेंडुलकरच्या नावावर होता,ज्यांनी 522 डावांमध्ये असे केले होते.
या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 544 डावांमध्ये हा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस 551 डावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे, ज्याने 568 डावांमध्ये ही कामगिरी केली.विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या खात्यात 12,169 एकदिवसीय, 3159 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि 7671 पेक्षा जास्त कसोटी धावा आहेत. विराटने आतापर्यंत 27 कसोटी, 43 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके लावले आहेत.