सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (12:12 IST)

IND vs NZ :न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग-11

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असून हा सामना जिंकून ते टी-20 मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतील. असे झाल्यास टीम इंडियाचा न्यूझीलंडच्या भूमीवर सलग दुसरा टी-20 मालिका विजय ठरेल. याआधी 2020 मध्ये शेवटच्या दौऱ्यात टीम इंडियाने टी-20 मालिका 5-0 ने जिंकली होती.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार केन विल्यमसन हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी टीम साऊदी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत आहे. सौदीने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला. विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्यानेही प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे.
 
 जाणून घ्या दोन्ही  संघाची प्लेइंग-11
 
भारत: ईशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
 
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी (क), लॉकी फर्ग्युसन.
 
Edited By- Priya Dixit