शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (19:10 IST)

IND vs SA: संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले

Sanju Samson
IND vs SA: पार्ल येथे झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने फलंदाजी केली . सॅमसनने 110 चेंडूंचा सामना करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. सॅमसनला पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी 8 वर्षांचा प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागली.
 
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रजत पाटीदारने वनडे पदार्पण केले. 22 धावा करून तो बाद झाला. दोन सामन्यांमध्ये सलग अर्धशतकं झळकावणारा साई सुदर्शन केवळ 10 धावा करून बाद झाला. 
 
संजू सॅमसनने सावध खेळ करत केएल राहुल (21) याच्या साथीने प्रथम संघाचा स्कोअर बोर्ड पुढे नेला. यानंतर त्याने तिलक वर्मा (52) सोबत 136 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने संयम दाखवत 110 चेंडूत पहिले एकदिवसीय शतक झळकावले. तो 114 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान सॅमसनने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
 
संजू सॅमसनने 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. अनेकवेळा संघात आणि संघाबाहेर राहिल्यानंतर, अखेर 29 महिन्यांनंतर सॅमसनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. सॅमसनने 16 एकदिवसीय सामन्यांच्या 14 डावांमध्ये 510 धावा केल्या आहेत. या काळात एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. सॅमसनने 19 जुलै 2015 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. झिम्बाब्वे विरुद्ध पहिला T20I सामना खेळला.
 
 
Edited By- Priya DIxit