गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (14:44 IST)

IND vs SA: दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऋषभ पंत धोनीचा विक्रम मोडणार ?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर पासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला या कसोटीत धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. ऋषभ पंतला न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून घेण्यात आले. साहाने मुंबईतील किवीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. पण पंतची कामगिरी पाहता त्याला पहिल्या कसोटीत खेळवले जाणे जवळपास निश्चित आहे.
पंतने आतापर्यंत कसोटीत 97  बळी घेतले आहेत. यात 89 झेल आणि 8 स्टंपिंग आहेत. धोनीला मागे टाकून पंत अनोखा विक्रम करू शकतो. पंतने पहिल्या कसोटीत तीन विकेट घेतल्यास तो भारतासाठी कसोटीत सर्वात जलद 100 बळी घेणारा यष्टिरक्षक बनेल. 24 वर्षीय पंतने भारतासाठी 25 कसोटी सामने खेळले आहेत. धोनीने 36 कसोटी सामन्यात 100 विकेट घेतल्या आहेत. पंत जर सेंच्युरियनमध्ये ऐतिहासिक कामगिरी करू शकला तर तो धोनीच्या आधी विक्रमी 10 कसोटी सामने खेळेल. 
गेल्या एका वर्षात पंतने फलंदाजी आणि यष्टीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याने काही जबरदस्त खेळी खेळल्या. मात्र, पंतची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही पहिलीच कसोटी असेल. भारताने 2019 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळली. पण पंतऐवजी ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्यात आले. भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत फक्त तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.