सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2017 (11:11 IST)

टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी आघाडी

इंदूरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेवर 88 धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

रोहित शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारतानं श्रीलंकेसमोर 261 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारता आली. श्रीलंकेकडून उपुल थरंगा आणि कुशल परेरानं दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलनं थरंगाला बाद करत टीम इंडियाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीप यादवनं कुशल परेरासह तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताचा मालिका विजय साजरा केला. तर यजुवेंद्र चहलनं 52 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

सुरुवातीला रोहित शर्मानं तुफानी फलंदाजी करताना 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं.  टीम इंडियानं उभारलेली ही टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.