1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (22:33 IST)

India Squad For Asia Cup T20: आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, कोहली-राहुलचे पुनरागमन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया कप टी-20 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि केएल राहुल भारतीय संघात परतले आहेत. रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळणार आहे. केएल राहुल संघाचा उपकर्णधार असेल. याशिवाय दीपक हुडा, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी संघातील स्थान वाचवण्यात यश मिळविले.
 
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. यामुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही. भारताने 15 खेळाडूंसह तीन खेळाडूंना स्टँडबायवर राहण्यास सांगितले आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
 
आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन , युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल.