बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जून 2019 (15:38 IST)

भारत घरेलू सत्रात 5 टेस्ट, 9 वनडे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने 2019-20 च्या घरेलू सत्रासाठी कार्यक्रमाची घोषणा केली आहेत, ज्यात 5 टेस्ट, 9 एकदिवसीय आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळले जातील. 
 
भारताच्या घरेलू सत्राची सुरुवात गांधी-मंडेला सीरीजसाठी फ्रीडम ट्रॉफीने होईल, जे सप्टेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळली जाईल, यात 3 ट्वंटी-20 आणि 3 टेस्ट होतील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत बांग्लादेश विरूद्ध 3 ट्वेंटी-20 आणि 2 टेस्ट खेळणार. डिसेंबरमध्ये वेस्टइंडीज संघ भारतीय दौर्यावर येणार आणि 3 ट्वेंटी-20 सह 3 एकदिवसीय सामने खेळणार. त्यानंतर झिंबाब्वे आणि ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार. जानेवारीमध्ये झिंबाब्वे 3 ट्वेंटी -20 आणि ऑस्ट्रेलिया 3 एकदिवसीय सामने खेळेल. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिका भारतीय दौऱ्यावर एकदिवसीय सामने खेळेल. 
 
घरेलू सत्राचे 5 टेस्ट, टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असतील.