गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (17:23 IST)

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळू शकते

India tour of South Africa: Instead of staying undefeated
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी रहाणेला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते. तथापि, बीसीसीआयने त्यामागे हॅमस्ट्रिंगचे कारण सांगितले. प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर आता रहाणेकडून कसोटीतील उपकर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते. बीसीसीआय आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रहाणेच्या जागी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करू शकते. या साठी टी-20 कर्णधार रोहित शर्मा चे नाव आघाडीवर आहे. बीसीसीआय लवकरच याची घोषणा करू शकते. 
रहाणेने गेल्या वर्षी विराटच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळली आणि संघाला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. पण अलीकडच्या काळात त्याचे फॉर्म चांगले नाही.   
कर्णधार रहाणेने सहा सामने खेळले असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने एकही सामना गमावला नाही, तर चार जिंकले आहेत. मात्र खराब फॉर्ममुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे कसोटी संघात उपकर्णधारपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण रोहितला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते, असे वृत्त आहे. भारत 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.