1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2024 (21:18 IST)

INDIA vs CANADA : ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना रद्द

India Vs Canada
फ्लोरिडामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही आणि पंचांनी दोनदा मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. फ्लोरिडामध्ये सामन्यापूर्वी भरपूर पाऊस झाल्याने मैदान ओले झाले होते. मैदान कोरडे करण्याचा आटोकाट प्रयत्न मैदानधारकांनी केला.
 
भारतीय संघाने अ गटातून आधीच सुपर एटमध्ये प्रवेश केला असून हा सामना रद्द झाल्याने त्यात काही फरक पडलेला नाही. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना ओल्या आउटफिल्डमुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द झाल्यानंतर भारत आणि कॅनडाला प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.भारतीय संघ आता 20 जून रोजी सुपर एटमध्ये अफगाणिस्तानशी भिडणार आहे.
 
भारत आणि कॅनडा यांच्यातील गट A सामना पावसामुळे वाहून गेला आणि या सामन्यात नाणेफेक देखील होऊ शकली नाही. मैदान ओले असल्याने सामना सुरू होऊ शकला नाही आणि अखेर मैदानाची अवस्था पाहून पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना होता.
 
 
Edited by - Priya Dixit