बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मोहाली , मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (15:50 IST)

मोहाली कसोटीत भारताने इंग्लंडला आठ विकेटने पराभव केला

भारताने मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात चवथ्या दिवशी इंग्लंडचा आठ विकेटने पराभव करून कसोटी मालिकेत आपला कब्जा केला आहे. या विजयानंतर भारतीय संघ पाच सामन्याच्या मालिकेत 2-0ने पुढे निघाला आहे. भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच सातव्या क्रमांक किंवा त्याखाली खेळणाऱ्या तीन खेळाडूंनी (आश्विन, जडेजा व जयंत) एका डावात अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली. काल मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करताना भारताला 134 धावांची आघाडी मिळवून दिली. भाराताकडून जाडेजाने 90 धावांची खेली केली. तर अश्विन 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतातर्फे अशी कामगीरी प्रथमच झाली आहे. तळाच्या फलंदाजांनी 3 शतके करण्याची कामगिरी अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांच्या नावावर झाली आहे. 
 
तिसऱ्या दिवशी अश्विन जाडेजाने केलेल्या ९७ दावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने सोमवारी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४१७ धावांची मजल मारली आणि पहिल्या डावात १३४ धावांची आघाडी घेतली. जडेजाने उपाहारानंतर ख्रिस व्होक्सच्या एका षटकात चार चौकार लगावले. त्यानंतर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात जडेजा लाँग ऑन सीमारेषेवर तैनात व्होक्सकडे झेल देत माघारी परतला. उमेश यादवने जयंतसोबत ३३ धावांची भागीदारी करीत भारताला ४०० चा पल्ला ओलांडून दिला. 
 
जडेजाची यापूर्वीची सर्वोच्च खेळी ६८ धावांची होती. ही खेळी त्याने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध साकारली होती. जयंतने आपली उपयुक्तता सिद्ध करताना मालिकेत सलग तिसऱ्यांदा भारताला ४०० चा पल्ला ओलांडून दिला. भारताविरुद्ध पाहुण्या संघाने पहिल्या डावात ६५ पेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर कधीच विजय साकारलेला नाही. गेल्या ५२ वर्षांत १९६४ मध्ये बॉब सिम्पसनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ६५ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताचा पराभव केला होता. या अगोदर भारताने आपल्या पहिल्या डावात 417 धावा काढल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला होता.