सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (07:11 IST)

INDW Vs BANW : भारतीय महिला संघाचा बांगलादेश कडून प्रथम एकदिवसीय सामन्यात 40 धावांनी पराभव

India Women vs Bangladesh Women 2023:  भारत आणि बांगलादेश महिला संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 113 धावाच करता आल्या आणि डकवर्थ लुईस पद्धतीने सामना 40 धावांनी गमावला. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला बांगलादेशकडून सामना गमवावा लागला आहे.
 
अनुषाच्या धावबाद झाल्यामुळे भारताचा डाव ११३ धावांवर आटोपला आणि बांगलादेशने महिला वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचा पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना 44 षटकांचा करण्यात आला आणि प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 43 षटकांत 152 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडिया 35.5 षटकांत केवळ 113 धावाच करू शकली आणि डकवर्थ-लुईस पद्धतीने सामना 40 धावांनी गमावला. 
 
बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर फरगाना हकने २७ धावांची खेळी केली. भारतासाठी पहिला वनडे खेळणाऱ्या अमनजोत कौरने चार विकेट घेतल्या. देविका वैद्यला दोन आणि दीप्ती शर्माला एक विकेट मिळाली. भारतासाठी दीप्तीच्या बॅटमधून सर्वाधिक 20 धावा झाल्या. अमनजोत कौर आणि यास्तिका भाटिया यांनी 15-15 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मुर्फा अख्तरने चार विकेट घेतल्या. राबिया खानने तीन विकेट घेतल्या. नाहिदा अख्तर आणि सुलताना खातून यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
टी-20 मालिका2-1 ने जिंकल्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभव भारतासाठी चिंतेचा विषय आहे. टीम इंडिया पुढील सामन्यात दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
 




Edited by - Priya Dixit