बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (15:21 IST)

चार खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी जाणार

आयपीएलची ऐन  रंगात आलेले असतांना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी हे चौघे मायदेशी परतणार आहेत. बंगळुरुकडून खेळणारे मोईन अली, आणि ख्रिस वोक्स, चेन्नईकडून खेळणारा मार्क वूड आणि राजस्थानकडून खेळणारा बेन स्टोक्स या चौघांना मायदेशी परतण्याची सूचना इंग्लिश बोर्डाने केली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्यांना इंग्लिश बोर्डाने माघारी बोलावले आहे.

या चौघांमध्ये बेन स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला तब्बल १२.५ कोटी रुपये मोजून राजस्थान रॉयल्सने खरेदी केले. मात्र त्याला या स्पर्धेत कोणतीही छाप पाडता आलेली नाही. इंग्लंडचा दुसरा अष्टपैलू ख्रिस वोक्सकडून आरसबीला अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण करण्यात तो अपयशी ठरल्याने वोक्सला आरसीबीने सध्या संघाच्या बाहेरच बसवले आहे. मोईन अली आरसीबीकडून फक्त एक सामना खेळला आहे. यात आरसीबीचा पराभव झाला आणि त्यांचा संघ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर झाला. तर ख्रिस वूडलाही चेन्नई सुपर किंग्जने केवळ एकाच सामन्यात संधी दिली होती. त्या सामन्यात त्याने ४ षटकात एकही विकेट्स न घेता ४९ धावा दिल्या. या महागड्या स्पेलनंतर वूड चेन्नईच्या बेंचवरच बसून आहे.