बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (18:19 IST)

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

मुंबईने शनिवारी लखनौमध्ये रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध विजय मिळवत इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अजिंक्य रहाणेच्या संघाने शेष भारताचा पराभव केला आणि 27 वर्षांनंतर इराणी चषक ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले. 
 
मुंबईने शेवटचा 2015-16 मध्ये इराणी कपचा अंतिम सामना खेळला होता. आता मुंबई संघाने 15 व्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने शेवटच्या दिवसाची सुरुवात सहा गड्यांच्या मोबदल्यात 153 धावांवर केली आणि दुसरा डाव आठ गडी बाद 329 धावांवर घोषित केला.

अशाप्रकारे मुंबईची एकूण आघाडी 450 धावांची झाली. पहिल्या डावात 64 धावा करणाऱ्या कोटियनने 20 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि 150 चेंडूत 114 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. एका सत्रापेक्षा कमी कालावधीत 451 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे अशक्य होते, त्यामुळे शेष भारताचा कर्णधार गायकवाडने त्याचा प्रतिस्पर्धी अजिंक्य रहाणेसोबत सामना अनिर्णित ठेवला. अशाप्रकारे गतविजेत्या रणजी चॅम्पियन मुंबईने सामना जिंकला.मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने विजयानंतर आनंद व्यक्त केला आणि म्हणाला - 27 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकणे ही खूप छान भावना आहे. ही लाल मातीची विकेट होती.

तनुष कोटियनने शेवटच्या सत्रात आणि या सामन्यात चमकदार कामगिरी केली. या सामन्यात पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या सरफराज खानला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
Edited by - Priya Dixit