गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (11:52 IST)

जसप्रीत बुमराह आणि मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार,सचिन तेंडुलकर सन्मानित

BCCI Naman Awards
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 'नमन पुरस्कार' समारंभात कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या समारंभात रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूंच्या श्रेणीत, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, सरफराज खानला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि आशा शोभना यांना सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार देण्यात आला.
महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि दीप्ती शर्माला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शशांक सिंगला सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल ऑलराउंडर आणि तनुष कोटियनला सर्वोत्कृष्ट रेड बॉल ऑलराउंडरचा पुरस्कार देण्यात आला.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा सर्वाधिक धावा करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सचिन तेंडुलकरने बीसीसीआयचे आभार मानले असून, बोर्डाने नेहमीच खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. 1989 मध्ये मी 16 वर्षांचा होतो, पण आज जेव्हा रविचंद्रन अश्विनने सचिन सर म्हटले तेव्हा मला माझे वय जाणवले.
पुरस्कार मिळाल्यानंतर रविचंद्रन अश्विन म्हणाला की, मी महान सचिन तेंडुलकरसोबत खेळेन असे मला कधीच वाटले नव्हते. 
 
Edited By - Priya Dixit