रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (15:55 IST)

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

IND vs SA
India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे. उभय संघांमधील मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. भारतीय संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज असेल. 
 
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळले गेले आहेत. भारताने 16 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. प्रोटीजच्या मैदानावर दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर रात्री 7.30 वाजता सुरू होईल.नाणेफेक रात्री 7 वाजता  होईल. 
 
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे...
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, विजयकुमार वैशाक, आवेश खान, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, यश दयाल, रवी बिश्नोई, रमणदीप सिंग, जितेश शर्मा.
दक्षिण आफ्रिका: रीझा हेन्ड्रिक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (क), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, एन पीटर, ओटनील बार्टमन, डोनोव्हन फरेरा, मिहलाली मपोंगवाना, पॅट्रिक क्रुगर .
Edited By - Priya Dixit