रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सन्मानजनक मानधन हवे: मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची मागणी पुरूष क्रिकेटपटूंइतके मानधन मिळायला हवे. अशी मी कधीच मागणी केली नाही. पुरूष क्रिकेटमधून भारतीय नियामक क्रिकेट मंडळाला मिळणारा महसूल हा अधिक असतो. त्याचा निम्मा महसूलही महिला क्रिकेटमधून मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याएवढ्या मानधनाची मागणी करणे चुकीची आहे पण सन्मानजनक मानधनाची मागणी करणेही गैर नाही, असे स्पष्ट मत भारतीय ‍महिला क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू मिताली राजने व्यक्त केले.

महिलांना मिळणारे मानधन हे रणजी क्रिकेटपटूंपेक्षा कमी असते का, या प्रश्नवार मिताली फक्त हसलीच.
 
मितालीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने आशियाई ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला नमवून सलग सहाव्यांदा जेतेपद पटकावले.