संबंधित माहिती
- ग्लेन मॅक्सवेलवर जेव्हा बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका झाली होती...
- AUS vs AFG : ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत
- अँजलो मॅथ्यूज : क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 'या' आहेत 10 पद्धती
- AUS vs AFG : अफगाणिस्तानसाठी 'करो या मरो' लढत,चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी सामना
- SL vs BAN: बांगलादेशने विश्वचषकात प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला
Mohammad Shami Wife Interview शामीच्या बायकोच वादग्रस्त वक्तव्य
social media
मुलाखतीत हसीन जहाँला सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात शमी आणि टीम इंडियाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. सुरुवातीला जहाँने सांगितले की ती क्रिकेट आणि क्रिकेटर्सची फॅन नाही. मात्र, शमी चांगली कामगिरी करत असेल, भारतीय संघात राहून चांगली कमाई करत असेल तर कुटुंबाच्या भवितव्यासाठी चांगले असेल, असे ती म्हणाली.
"काहीही झाले तरी, जर तो चांगली कामगिरी करत असेल, तर भारतीय संघात राहतील आणि चांगली कमाई करतील, ते आमचे भविष्य सुरक्षित करेल."
या वर्षाच्या सुरुवातीला, मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात त्याच्या विभक्त पत्नीला मासिक 1,30,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी 6 जून 2014 रोजी विवाहबंधनात अडकले. 2015 मध्ये या जोडप्याला मुलीचा जन्म झाला. 8 मार्च 2018 रोजी जहाँने तिच्या पतीविरुद्ध धमक्या, बेवफाई आणि हुंड्याची मागणी करत एफआयआर दाखल केला होता. हे जोडपे 2018 पासून वेगळे राहत आहेत.
