1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 मार्च 2025 (16:02 IST)

मोहम्मद शमीच्या मुलीने होळी खेळण्यावरून युजर्सने केले ट्रोल

14 मार्च रोजी संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा करण्यात आला. क्रिकेटपटू मोहम्मद शमीची मुलगी देखील या सणात रंगली होती. मुलीचा फोटो शमीची माजी पत्नी हसीनजहा यांनी शेअर केला. तिने मुलगी आयराचा फोटो शेअर करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या वरून काही लोकांनी गदारोळ केला आहे.
काही दिवसांपूर्वी रमजानच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी सामना दरम्यान मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक प्यायल्यावरून धर्मगुरूंनी आरोप लावत.शमीने हे चुकीचे केले आहे असे म्हटले गेले. आता मुलगी आयराने रंग खेळण्याचा फोटो समोर आल्यावर लोकांनी शमीच्या मुलीला आणि पत्नीला ट्रोल केले  आहे.  तसेच कॉमेंट्स देताना अपशब्द वापरले आहे. रमजानच्या महिन्यात होळी खेळणे पाप असल्याचे म्हटले आहे. 
 


एका युजर्स ने कॉमेंट्स केले की आपल्या मुलीला स्वतः सारखे निर्लज्ज बनवू नका. एकाने विचारले ती मुस्लिम आहे की नाही. तर काहींनी त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. एकाने लिहिले ती अजून लहान आहे. बाळा तू होळी खेळ आणि एन्जॉय कर.मौलानांना अडचण असेल तर त्यांनी देखील खेळावी असे लिहिले आहे. 
शमी आणि त्यांची पत्नी 2012 मध्ये भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी 2014 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये आयरा शमी नावाची मुलगी झाली . 
शमी यांची पत्नी हसीनजहाने 2018 मध्ये शनिवार विश्वासघात, घरगुती हिंसाचार , बलात्कार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप लावले. या मुळे शमीला टीकेला सामोरी जावे लागले. शमीच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झाला. नंतर त्याने कायदेशीर मार्ग स्वीकारत घटस्फोटाची याचिका दाखल केली. अद्याप दोघांचाही घटस्फोट झालेला नाही.