गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2017 (09:30 IST)

धोनीने आणली ‘सेव्हन’ स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज

महेंद्रसिंह धोनीने ‘सेव्हन’ या नावाने धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे. रांची येथील न्यूक्लियस मॉलमध्ये धोनीच्या दुकानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी धोनीने आपला खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शूज, खेळाशी संबंधित सामुग्री आणि इतर वस्तू या दुकानात मिळतील.

अशाप्रकारचे आऊटलेट संपूर्ण देशभरात सुरु करण्यात येणार आहेत. वर्षअखेरपर्यंत सुमारे 20 ते 25 आणखी आऊटलेट उघडले जातील. तर 2020 पर्यंत देशात यांची संख्या वाढून जवळपास 275 केली जाईल, असंही धोनीने सांगितलं.