शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

एका चाहत्याने केला प्रशिक्षक पदासाठी अर्ज

अनिल कुंबळे आणि विराट कोहली वादाने क्रिकेट विश्व हादरून गेले आहे.त्यामुळे अनेक चाहते चिडले आहे. अनिल कुंबळे याचे देशात जुन्या आणि नवीन पिढीत अनेक चाहते आहेत. हा वाद आणि कुंबळे राजीनामा यामुळे अनेकांनी विराट कोहलिवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र यातही एक चाहता तर विराटला सरळ करायला निघाला आहे.

नाशिक येथील रहिवासी असलेल्या इंजिनिअरने चक्क बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. नाशिक येथील सेझ प्रकल्प असलेल्या इंडिया बुल्स येथे इंजिनिअर म्हणून ब्रम्हचारी म्हणून काम करत आहेत.  हा अर्ज बीसीसीआय कडे गंमतीचा विषय जरी असला तरी पूर्ण देशात या अर्जावरून सोशल साईटवर पुन्हा विराटवर टीकेची झोड उठली आहे. तर राष्ट्रीय माध्यमांनी पुन्हा वादाचा मुद्दा लावून धरला आहे.