शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (10:37 IST)

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. यानंतर बांगलादेशचे फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि अवघ्या 149 धावांवर बाद झाले. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला 227 धावांची आघाडी मिळाली.

यशस्वी जयस्वालने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 56 आणि 10 धावांची खेळी केली आणि सामन्यात एकूण 66 धावा केल्या. कारकिर्दीतील पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय खेळाडू बनला आहे.वयाच्या 22 व्या वर्षी यशस्वीने सुनील गावस्कर यांचा 51 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.यापूर्वी, भारतासाठी कारकिर्दीतील पहिल्या10 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावसकर यांच्या नावावर होता.जैस्वालने आतापर्यंत कारकिर्दीतील पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 1094 धावा केल्या असून गावस्करच्या पुढे गेला आहे.

यशस्वी जैस्वालने 2023 साली भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 1094 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतकांचा समावेश आहे.टीम इंडियासाठी 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 723 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत. 
Edited By - Priya Dixit