गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (11:37 IST)

New Zealand vs Ireland T20 WC : आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने घेतली हॅटट्रिक

आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने टी-20 विश्वचषक सुपर-12 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.न्यूझीलंडविरुद्धच्या डावाच्या 19व्या षटकात त्याने ही कामगिरी केली.न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांच्या विकेट्स घेऊन लिटिलने ही कामगिरी केली.यासह लिटल हा कर्टिस कॅम्परनंतर हॅट्ट्रिक घेणारा दुसरा आयरिश गोलंदाज ठरला आहे.

2022 च्या टी-20 विश्वचषकातील ही दुसरी हॅटट्रिक आहे.यापूर्वी कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात T20 विश्वचषक 2022 गट 1 मधील महत्त्वाचा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे.प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 185 धावा केल्या.किवी संघाकडून कर्णधार केन विल्यमसनने 35 चेंडूत 61 धावा केल्या.न्यूझीलंडला २०० धावांपर्यंत मजल मारता आली असती, पण गोलंदाज जोशुआ लिटिनने हॅट्ट्रिक घेत न्यूझीलंडला १८५ धावांपर्यंत रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. 
 
Edited by - Priya Dixit