शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:28 IST)

भारतीय संघांच्या नव्या जर्सीचे अनावरण

आगामी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. ‘बीसीसीआय’ने नुकतेच भारतीय संघांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. याबाबत असून याबाबतची माहिती आणि छायाचित्र बीसीसीआयने या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केले आहे. छायाचित्रात भारतीय पुरूष आणि महिला संघातील मुख्य खेळाडू नव्या जर्सीमध्ये दिसतात. भारतीय संघाच्या जर्सीत निळा रंग कायम राखण्यात आला असून जर्सीच्या हाताजवळच्या रंगात बदल करण्यात आला आहे. हाताजवळ गडद निळा रंग देण्यात आला असून त्यास जोड म्हणून तिरंग्याची पट्टी देण्यात आली आहे.