सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (20:41 IST)

PAK vs USA: बाबर आझमचा मोठा पराक्रम,विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला

T20 World Cup 2024 चा 11 वा सामना पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात डलासच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने मोठा विक्रम केला असून त्याने विराट कोहलीला मागे टाकले असून पहिला क्रमांक पटकावला आहे. 
 
या सामन्यात 16 धावा करत बाबर आझमने आपल्या T20I कारकिर्दीत 4039 धावा पूर्ण केल्या. यासह तो T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.विराट कोहलीच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 4038 धावा आहेत.बाबर आझम ने विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आझमने या कालावधीत 36 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली आहेत. 
 
बाबर आझमने सलामीवीर म्हणून या सामन्यात प्रवेश केला. पण पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये त्याने 14 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. कोणत्याही सलामीवीराने केलेली ही सर्वात लहान धावसंख्या आहे. 
 
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने 152 सामन्यांच्या 144 डावांमध्ये 4026 धावा केल्या आहेत. नाबाद 121 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने आपल्या T20 कारकिर्दीत पाच शतके आणि तीस अर्धशतके झळकावली आहेत .न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 122 सामन्यांच्या 118 डावांमध्ये 3531 धावा केल्या आहेत. 
 
अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. कर्णधार बाबर आझम (44 धावा) आणि शादाब खान (40 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यात 20 षटकात 159 धावा केल्या होत्या. 
 
Edited by - Priya Dixit