रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:21 IST)

बारामतीत प्रथमच रणजी सामना

बारामतीत प्रथमच रणजी सामना खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांच्यामध्ये ही मॅच होणार आहे. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या सामन्याचा शुभारंभ केला जाणार आहे.
 
बीसीसीआयने बारामतीच्या मैदानात रणजी ट्रॉफी मॅच घ्यायला परवानगी दिली, त्यानंतर आता या मैदानात पहिलाच सामना खेळवण्यात येईल. बारामतीमध्ये रणजी सामन्यांचं आयोजन व्हावं या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं नुतनीकरण करण्यात आलं.