गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (10:41 IST)

IPL 2024 : ऋषभ पंतने केली आयपीएल 2024 ची तयारी सुरू

rishbh pant
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल 2024 च्या आधी जिममध्ये भरपूर घाम गाळत आहे. पंतने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना अपडेट दिले आहे. यावेळी त्याने असेच काहीसे शेअर केले आहे, जे पाहिल्यानंतर त्याचे चाहते खूप खूश आहेत. एक वर्षापूर्वी पंत यांचा कारचा भीषण अपघात झाला होता ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. 

आता पंतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून फिटनेस अपडेट दिला आहे. जिथे त्याने गुडघ्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा गुडघा आणि फिटनेस खूप सुधारल्याचे दिसून येते. 
 
तर दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने ऋषभ पंतला आयपीएल 2024 साठी कायम ठेवले होते. 
 
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ
 
डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत, इशांत शर्मा, अभिषेक पोरेल, मिचेल मार्श, एनरिक नोरखिया, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, लुंगी एनगिडी, खलील अहमद, मुकेश कुमार, अक्षर पटेल, यश धुल, ललित यादव. 

Edited By- Priya Dixit