रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा परदेशी फलंदाज बनला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. रोहितने फक्त 105 चेंडूत त्याचे 33 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. कोहली आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 168 धावांची भागीदारी केली.
या दोन फलंदाजांमुळेच भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. त्याच्या या खेळीमुळे रोहित ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज बनला
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 237 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 46.4 षटकांत236 धावांवर आटोपला. रोहित आणि कोहलीच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 38.3 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 237 धावा करून सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली.
रोहितने प्रथम त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 60 वे अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर त्याची शानदार खेळी सुरू ठेवत शतक ठोकले. या शतकाच्या आधारे रोहितने अनेक कामगिरी केली आहे. रोहित ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके करणारा परदेशी फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने कोहली आणि कुमार संगकाराला मागे टाकले.
कोहलीने ऑस्ट्रेलियात32 डावांमध्ये पाच शतके ठोकली आहेत, तर संगकाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 49 डावांमध्ये पाच शतके ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियात 33 डावांमध्ये रोहितचे हे सहावे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचे हे नववे शतक आहे आणि या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
Edited By - Priya Dixit

