गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलंबो , शनिवार, 3 जून 2017 (12:42 IST)

जयसूर्या अडचणीत!

sanath jaisurya in problem
श्रीलंपेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला सेक्स टेप लीक प्रकरणात पद सोडून किंमत चुकवावी लागू शकते. श्रीलंकन निवड समितीचा जयसूर्या अध्यक्ष असून काही वर्षांपूर्वीची ही सेक्स टेप आता समोर आली असली तरी, श्रीलंकन क्रिकेट आणि देशाची प्रतिमा यामुळे मलिन झाल्याचे मत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्‍यांचे आहे. जयसूर्याला त्यामुळे श्रीलंकन निवड समितीवरून हटवले जाण्याची शक्यता असून जयसूर्या सध्या श्रीलंकन निवड समितीचा प्रमुख असून त्याला मुदतवाढ देण्यास बोर्ड अजिबात इच्छुक नसल्याची माहिती आहे. जयसूर्या स्वत: चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धा संपल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा तसे त्याने नाही केले तर त्याला मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.