विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसन ने शतक झळकावले
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात निवड झालेला संजू सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये असण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याने चार वर्षांत पहिले लिस्ट ए शतक झळकावले, परंतु विजय हजारे ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील अंतिम गट अ सामन्यात केरळचा रेल्वेकडून पराभव झाल्याने त्याचा प्रयत्न व्यर्थ गेला. सॅमसनने एकहाती 139 चेंडूत 128 धावा केल्या, पण बेंगळुरू येथील कृती स्पोर्ट्स अरेना मैदानावर 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळचा 18 धावांनी पराभव झाला.
बेंगळुरू येथील किनी अरेना स्पोर्ट्स ग्राऊंडवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली आहे. रेल्वेसमोर 255 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केरळ संघासाठी कठीण काळात शतक झळकावले. 139 चेंडूंचा सामना करताना सॅमसनने 6 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 139 धावा केल्या. त्याने श्रेयस गोपालसोबत चांगली भागीदारी केली, मात्र असे असतानाही केरळ संघ 50 षटकांत 8 गडी गमावून 237 धावाच करू शकला.
साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्याच्या दिवशी पराभव होऊनही केरळ सात सामन्यांतून पाच विजयांसह अ गट गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबई 20 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे
संजू सॅमसनचे कौतुक करणाऱ्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचाही समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सॅमसनचा टीम इंडियात समावेश करण्यात आल्यामुळे तो योग्य वेळी फॉर्ममध्ये परतला आहे. विश्वचषक संघातून वगळल्यानंतर सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
Edited by - Priya Dixit