सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (18:01 IST)

Sanju Samson: टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन भारत-अ संघाचे कर्णधारपदी

न्यूझीलंड अ विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकासाठी निवड न झालेला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे भारत-अ संघाची कमान सोपवण्यात आली आहे. भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. 
 
निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी एक मजबूत संघ निवडला आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले खेळाडू देखील आहेत. कुलदीप यादव, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी या खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
 
याशिवाय, U-19 चा स्टार अष्टपैलू खेळाडू राज बावा , जो भविष्यात हार्दिक पांड्याचा बदली मानला जातो, त्यालाही संघात स्थान मिळाले आहे. राज बावा या वर्षीच्या अंडर-19 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. 19 वर्षीय बावाने अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 31 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. आता तो आपल्या वरिष्ठ कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंत त्याने चंदीगडसाठी दोन रणजी सामने आणि पंजाब किंग्जकडून दोन आयपीएल सामने खेळले आहेत. भारत अ मध्ये स्थान मिळवणे ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी आहे.

सॅमसनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. याशिवाय ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक, राहुल चहर, श्रीकर भारत, अभिमन्यू इसवरन, रजत पाटीदार, शाहबाज अहमद आणि राहुल त्रिपाठी यांचीही संघात निवड झाली आहे.
 
भारत अ संघ: संजू सॅमसन (क, विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चहर, टिळक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर , उमरान मलिक, नवदीप सैनी आणि राज बावा.