Festival Posters

पत्नीच्या ड्रेसवरील शेरेबाजीने शमी भडकला

नवी दिल्ली- पत्नीच्या ड्रेसवर असभ्य शेरेबाजी करणार्‍या नोटिझन्सना टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने फटकारले आहे. आमच्या खासगी आयुष्यात नाक खुसपण्यापेक्षा जरा स्वत:मध्ये डोकावून बघा, असं सडेतोड प्रत्युत्तर त्याने धर्माध टीककारांना दिले आहे.
 
23 डिसेंबरला मोहम्मद शमीने पत्नी हसीनसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. तो चांगलाच व्हायरल झाला. त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून लाइक दिले, पण काही उथळ, प्रतिगामी नेटकर्‍यांनी त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या.
तुझी बायको खूप क्यूट आहे, तिला बुरख्यातच ठेव... अशा कपड्यातला बायकोचा फोटो काढायला लाज वाटत नाही का? हिजाबमध्ये बायकोचा फोटो काढत जा... असे सल्ले स्वघोषित मुस्लिम धर्मरक्षकांनी शमीला दिले. ते पाहून शमी वैतागला.
 
अशातच, टीम इंडियाचा माजी शिलेदार मोहम्मद कैफ त्याच्या मदतीला धावला. या प्रतिक्रिया खरेच लज्जास्पद आहेत, शमीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन कैफने ट्विटरवरून केले. कैफ व्यतिरिक्त अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजने ही शमीला समर्थन दिले त्यामुळे शमीला बळ मिळाले.
 
शमीने टीकाकरांना खडे बोल सुनावले- माझी पत्नी आणि मुलगी माझे जीवन आणि आयुष्याच्या साथीदार आहेत. काय करायचे आणि काय नाही, हे मला चांगले कळते. आपण किती चांगले आहोत, हे स्वत:मध्ये डोकावून पाहा.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स

ऑरेंज कॅप आणि कारसह पाच पुरस्कार वैभव सूर्यवंशीने पटकावले

मोठी बातमी! हॉटेलकडे जाताना गुजरात टायटन्सच्या बसला आग; शुभमन गिलसह संपूर्ण टीम सुरक्षित

आरसीबीने पुन्हा ट्रॉफी जिंकली: विराट कोहलीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले

हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठत नवा विक्रम रचला

पुढील लेख
Show comments