रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2017 (22:55 IST)

शशांक मनोहर यांचा राजीनामा तात्पुरता स्थगित

shashank manohar
शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे.आयसीसीची वार्षिक परिषद एप्रिलमध्ये होत असून, त्यात मनोहर यांच्या वारसदाराची निवड करण्यात येईल. तोपर्यंत आयसीसीच्या अध्यक्षपदी कायम राहण्याचं आश्वासन मनोहर यांनी दिलं आहे. आयसीसी बोर्डाच्या बैठकीत मनोहर यांनीच अध्यक्षपदावर कायम राहण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. आयसीसी बोर्डाने दाखवलेल्या विश्वासाचा आदर राखून मनोहर यांनी आय आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे.