शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:48 IST)

ICCटी-20 रेँकिंग मध्ये शेफाली वर्माचे वर्चस्व कायम,स्मृती मंधाना या क्रमांकावर

भारताची युवा स्टार फलंदाज शेफाली वर्मा हिने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत महिला टी 20 फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनने अष्टपैलूंच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.शेफाली 759 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी (744) दुसऱ्या, तर भारतीय टी -20 उपकर्णधार स्मृती मंधाना (716) तिसऱ्या स्थानावर आहेत.ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग 709 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर सोफी 689 गुणांसह एक स्थानाने पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.
 
इंग्लंडविरुद्ध होव येथे झालेल्या तिसऱ्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 धावा काढण्याव्यतिरिक्त सोफीने 26 धावा देऊन दोन विकेट्सही घेतल्या.या कामगिरी मुळे,ती संयुक्तरीत्या इंग्लंडच्या नताली स्किवरसह अष्टपैलूंच्या यादीत पोहोचली आहे.अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा,ऑस्ट्रेलियाची एलीस पेरी आणि वेस्ट इंडिजची हॅली मॅथ्यूज यांनाही प्रत्येकी एक स्थान मिळाले आहे आणि ते अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर तीन स्थानांनी घसरून सातव्या स्थानावर आली आहे.
 
दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली फलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांनी वर आठव्या स्थानावर पोहोचली आहे. गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची मेगन शुट दोन स्थानांनी वर आली आहे.ऑस्ट्रेलियाच्या जेस योनासेननेही एक स्थानाने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. भारताची दीप्ती शर्मा देखील सहाव्या स्थानावर पोहचली आहे तर पूनम यादवने आठवे स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हॅली मॅथ्यूजने सात स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 15 मध्ये प्रवेश केला आहे.