SRH vs MI IPL 2021 : ईशान किशन ची झंझावाती फलंदाजी सुरू, मुंबईने 100 चा आकडा गाठला
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करत आहे. हा सामना अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत मुंबईची सुरुवात दमदार झाली असून संघाने एक विकेट गमावून 100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ईशान किशन आणि हार्दिक पंड्या ही जोडी क्रीजवर उपस्थित आहे. ईशान उत्कृष्ट फलंदाजी करत आहे आणि वेगाने त्याचे शतक गाठत आहे.
मुंबईने एक विकेट गमावून 112 धावा स्कोअर बोर्डावर ठेवल्या आहेत. हार्दिक पंड्या 10 आणि इशान किशन 83 धावा करत आहे. ईशान चमकदार फलंदाजी करत आहे आणि प्रत्येक चेंडूवर चौकार शोधत आहे.
मुंबई इंडियन्सने तुफानी सुरुवात केली आहे आणि एकही विकेट न गमावता स्कोअर बोर्डावर 78 धावा ठेवल्या आहेत. ईशान 315 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे आणि 60 धावा करत आहे. रोहित 17 धावा करून ईशानला साथ देत आहे.
ईशान किशनने आपले अर्धशतक फक्त 16 चेंडूत पूर्ण केले. हैदराबादचा कोणताही गोलंदाज ईशानच्या बॅटला लगाम घालू शकत नाही. मुंबईची सुरुवात दणक्यात झाली आहे.
ईशानची धुरंदरफलंदाजी सुरू आहे. 3 षटकांत मुंबईने एकही विकेट न गमावता 41 धावा स्कोअर बोर्डावर टाकल्या आहेत. ईशानने 12 चेंडूत 34 धावा केल्या आहेत आणि कर्णधार रोहित त्याला 7 धावांची साथ देत आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे-
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.
सनरायझर्स हैदराबाद संघ : जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे (कर्णधार), प्रियम गर्ग, अब्दुल समद, रिद्धीमान साहा, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद नबी, उमरान मलिक, सिद्धार्थ कौल.