संबंधित माहिती
- IPL 2026 : एलएसजी आणि डीसी खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक! वादाचा व्हिडिओ व्हायरल
- LSG vs DC: दिल्लीने लखनौवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली
- DC vs LSG : दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; दोन्ही संघांचे प्लेइंग ११
- वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला दंड ठोठावण्यात आला
- पंजाब किंग्सने गुजरातला तीन गडी राखून पराभूत केले
आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यासाठी एनओसी न मिळाल्याने या खेळाडूने न्यायालयात धाव घेतली
आयपीएल २०२६ साठी आरसीबी (RCB) संघात असलेल्या श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज नुवान थुशाराला श्रीलंका क्रिकेटकडून अद्याप सहभागासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आलेले नाही. नुवानने आता या संदर्भात एक मोठे पाऊल उचलले आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू झाला असून, आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहे. असे अनेक परदेशी खेळाडू आहेत जे अद्याप त्यांच्या फ्रँचायझींमध्ये सामील झालेले नाहीत. असेच एक नाव आहे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान थुशारा, जो आयपीएल २०२६ हंगामासाठी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या (Royal Challengers Bangalore) संघात आहे. नुवान थुशाराला चालू आयपीएल हंगामात खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेटकडून अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आलेले नाही आणि त्याने आता न्यायालयात धाव घेऊन एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नुवानने आता श्रीलंका क्रिकेटला एनओसी जारी करण्याचा आदेश मिळावा यासाठी कोलंबो जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याच्या याचिकेवर ९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
Edited By- Dhanashri Naik
