शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (15:33 IST)

स्टीव्ह स्मिथने कसोटीत विश्वविक्रम केले , कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विश्वविक्रम केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामन्याच्या चौथ्या दिवशी, स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम केला. या बाबतीत स्मिथने श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे टाकले. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ही त्याने मागे सोडले आहे. स्मिथने सर्वात कमी डावात 8000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. लाहोर कसोटीच्या चौथ्या दिवशी स्मिथ 17 धावांवर बाद झाले. स्मिथने आपल्या 151व्या कसोटी डावात हा विक्रम केला.
 
संगकाराबद्दल बोलायचे झाले तर त्याने 152 व्या कसोटी डावात हा पराक्रम केला, तर सचिन तेंडुलकरने 8000 कसोटी धावांचा टप्पा गाठण्यासाठी 154 डाव घेतले. लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथने 59 धावांचे योगदान दिले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रमही स्मिथच्या नावावर आहे. त्याने 126व्या डावात अशी कामगिरी केली. याचा अर्थ शेवटच्या 1000 धावांमध्ये त्याने 26 डाव घेतले.