शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2017 (11:16 IST)

सुषमा वर्माला नोकरीची ऑफर

विश्‍वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सुषमा वर्माला हिमाचल प्रदेश राज्य शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक (डीएसपी) पदाची ऑफर दिली आहे.
 
सिमल्यानजीकच्या ग्रामीण परिसरातील हिमरी हे सुषमा वर्माचे मूळ गाव आहे. राज्य शासनाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी म्हटले आहे की, सुषमा वर्माच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. तिच्या सन्मानार्थ आम्ही तिला डीएसपी पदाची ऑफर देत आहोत.