रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (16:11 IST)

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

Cricket_740
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून काम करताना दिसणार आहे. संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. राहुल गेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता.
 
नुकतेच टीम इंडियाचा भाग असलेले तीन मोठे चेहरे भारतीय संघातून वगळण्यात आले आहेत. यामध्ये केएल राहुलशिवाय रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. मात्र, बीसीसीआयने रिंकू आणि शुभमनला प्रवासी राखीव ठेवला आहे. रिंकूपेक्षा शिवम दुबेला प्राधान्य देण्यात आले आहे.निवडकर्त्यांनी शुभमनपेक्षा यशस्वीला प्राधान्य दिले आहे. निवडकर्त्यांनी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक म्हणून संधी दिली आहे. 

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.
 
Edited By- Priya Dixit