बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (15:40 IST)

टी -20 वर्ल्डकपसाठी अशी आहे भारतीय संघाची जर्सी

टी -20 विश्वचषक सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून पात्रता स्पर्धा खेळणाऱ्या श्रीलंकेची जर्सी लाँच करण्यात आली आहे. भारताची जर्सी देखील आज अधिकृतपणे लाँच करण्यात आली.
 
बीसीसीआयने एक फोटो ट्विट केला ज्यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एकत्र उभे आहेत. जर्सीमध्ये 3 तारे आहेत जे भारताच्या तीन विश्वचषकांचे (1983, 2011 आणि 2007) प्रतिनिधित्व करतात .
 
या वेळी विराट कोहली पहिल्यांदाच कर्णधार म्हणून टी -20 विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे, मात्र, यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून नव्हे, तर मेंटॉर म्हणून संघासोबत असेल.