गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2024 (15:14 IST)

श्रीलंकेचा माजी प्रसिद्ध क्रिकेटपटूचा भयानक अपघात

श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूच्या कारला अपघात झाला आहे. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या खेळाडूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची कार अपघातात चक्काचूर झाली आहे. 
 
श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू लाहिरू थिरिमा कार अपघाताचा बळी ठरला आहे. दिग्गजांच्या गाडीचे तुकडे झाले. अपघातानंतर खेळाडूचे प्राण सुदैवाने  वाचले. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खेळाडूच्या प्रकृतीबाबत अपडेट देत फ्रँचायझीने सांगितले की, तो धोक्याबाहेर आहे. यामुळे त्याच्या करोडो चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
मंदिरात दर्शन करून घरी परतत असताना हा अपघात झाला.श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमाने यांची कार एका लॉरीला धडकली . त्यामुळे अपघात झाला आहे. कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी या खेळाडूला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
लाहिरू थिरिमाने 2023 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले होते
थिरिमानेश्रीलंकेसाठी एकूण 44 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2088 धावा केल्या. याशिवाय त्याने 127 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
 
Edited by - Priya Dixit