U-19 : राहुल द्रविड यांचा मुलगा समितचा भारतीय अंडर-19 संघात समावेश
भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर 19 संघात निवड झाली आहे. समितला एकदिवसीय आणि चार दिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अमानकडे असेल, तर चार दिवसीय सामन्यांचे नेतृत्व सोहम पटवर्धनकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासाठी संघाची घोषणा केली.
21 सप्टेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून पुढील दोन सामने 23 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. हे सामने पुद्दुचेरी येथे होणार आहेत. त्यानंतर 30 सप्टेंबर आणि 7 ऑक्टोबरला चेन्नईत चार दिवसीय सामने होणार आहेत.
समित हा एक वेगवान गोलंदाज आहे आणि सध्या तो KSCA महाराजा T20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे.या 18 वर्षीय खेळाडूने आठ सामन्यात 362 धावा केल्या होत्या आणि जम्मू विरुद्ध 98 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय त्याने चेंडूवरही प्रभावी कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात मुंबईविरुद्धच्या दोन विकेटसह आठ सामन्यांत 16 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघ पुढीलप्रमाणे आहे...
एकदिवसीय संघ: रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पंगालिया, समित द्रविड, युधजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद इनान.
चार दिवसीय संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया,चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंह, मोहम्मद इनान.
Edited by - Priya Dixit